जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शासकीय रुग्णालयातून कोरोना रुग्ण पसार, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

शासकीय रुग्णालयातून कोरोना रुग्ण पसार, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

शासकीय रुग्णालयातून कोरोना रुग्ण पसार, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड वॉर्डातून (COVID-19) सकाळी सात वाजता एक कोरोना बाधित रुग्ण न सांगता पसार झाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 13 मार्च: नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याठिकाणी असणाऱ्या कोव्हिड  वॉर्डातून (COVID-19) सकाळी सात वाजता एक कोरोना बाधित रुग्ण न सांगता पसार झाला होता. इतर अन्य रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर त्यांच्या मागे हा रुग्ण निघून गेल्याची घटना घडली आहे. तब्बल नऊ तासांनंतर या रुग्णाचा पत्ता लागला. या रुग्णाची मानसिक परिस्थिती ठीक नस्लयाची माहिती मिळाली. मेडिक अधिक्षक अविनाश गावंडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान पसार झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केलं जाणार आहे. 11 मार्चला हा रुग्ण याठिकाणी भरती झाला होता. संबंधित रुग्ण हिंगणाघाट याठिकाणचा आहे. संबंधित रुग्ण सकाळी चहा-नाश्ता करण्याच्या वेळेमध्ये गायब झाला होता. कोव्हिड 19 वॉर्डातून तो पसार झाल्यानंतर काही वेळाने रुग्णालय प्रशासनाच्या ही बाब ध्यानात आली. तब्बल 9 तास हा रुग्ण गायब झाला होता. तब्बल नऊ तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा शोध लागलेला आहे. आता त्याच्या संपर्कात कोण कोण आले त्याचा शोध घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. पण यामध्ये कुणाची दोष नाही तो इतर रुग्णांच्या नातेवाईकांच्या मागे-मागे  निघून गेला असं मेडिकलचे अधीक्षक अविनाश गावंडे यांनी सांगितला आहे. (हे वाचा- मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये 31 मार्चपर्यंत शाळा बंद ) नागपूर मध्ये आज तिसरा विकेंड लॉकडाऊन आहेत तर सोमवार पासून पूर्णत: लॉकडाऊन असणार आहे. आज पण अत्यावश्यक सेवा सोडल्यास सरकारी आणि खाजगी कार्यालय बंद आहेत, बाजापेठा बंद आहेत. असे असले तरी मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर दिसतात.  दुसरीकडे नागपूर मध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. नागपुरात सलग सहा दिवस दररोज 1000 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात