नागपूर, 05 डिसेंबर : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नुकतेच निकाल लागले. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपुरात त्यांचा धोपीपछाड करण्यात आला. नागपुराच्या या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागण्याची वेळ येते की काय अशी अवस्था झाली आहे. त्याचे बुरुज हळूहळू ढासळण्यास सुरुवात झाली. विधानपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपची पिछेहाट झाली तसंच नुकत्याच पार पडलेल्या पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा काँग्रेसनं बाजी मारत भाजपचा गड काबीज केला. नागपुरात भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 18 हजारहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावरही देखील अनेक कारण आणि चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत जनसंघ आणि नंतर भाजपचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात भाजपच्या नाकावर टिचून मिळवलेल्या काँग्रेसच्या या विजयामुऴे सोशल मीडियावर मात्र चर्चेला उधाण आलं आहे. नागपूरकरांनी निकालानंतर सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना महापौर विरुद्ध आयुक्त असा वाद झाला होता. या वादानंतर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. तुकराम मुंढे अडचणीत येतील यासाठी महापालिकेतून प्रयत्न केले जात होते. आता नागपूरच्या जनतेनं याचं स्पष्टीकरण देत निकाल दिल्याची चर्चा आहे.
नागपुरचा भू पू मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असून नागपुर ला हरता त्याचे काय?
— भारत का आम आदमी (@CommonManofInd0) December 4, 2020
नागपूरचा भाजपाचा उमेदवार पाडल्याबद्दल
— अभिजीत पळसकर (@abhi_palaskar1) December 4, 2020
नागपूरकरांचे विशेष अभिनंदन 😅💐💐💐@abey_satya @gpekmaratha
कराल काय बदली
— Vedant (@Vedant58347797) December 3, 2020
तुकाराम मुंढे ची बदली केली होती ना
आता लक्ष्य २०२२ नागपूर महानगरपालिका.
जनतेला वेठीस धरणे बंद करा.
जनतेला मूर्ख समजणे बंद करा.@nitin_gadkari @SandipJoshiNGP @Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS pic.twitter.com/goal1aFAru
तुकाराम मुंढे सोबत पंगा घेण महागात पडलं नागपूरमध्ये
— Pluto (@SwarajSoBo) December 5, 2020
हे वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा असेल अमरावती, औरंगाबाद दौरा तुकाराम मुंढेंसोबत पंगा घेणं महागात पडलं, नागपूरच्या जनतेनं त्यांना तोंडावर पाडलं. तुकाराम मुंढे यांना नागपुरातून काढल्या मुळे नागपूर करानी दिलेला एक धक्का आहे. अशा आणि या पद्धतीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नागपूरकरांनी भाजपला दिलेला हा दणका असल्याचं देखील सांगितलं जात आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रथमक काँग्रेनं विजय मिळवला आहे.