मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा असेल अमरावती, औरंगाबाद दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असा असेल अमरावती, औरंगाबाद दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेर निघत नाही, असा आरोप विरोधक कायम करतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेर निघत नाही, असा आरोप विरोधक कायम करतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेर निघत नाही, असा आरोप विरोधक कायम करतात.

मुंबई, 5 डिसेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शनिवारी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून बाहेर निघत नाही, असा आरोप विरोधक कायम करतात. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी राज्यात फिरावे, असा सल्ला दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा आज पुन्हा एकदा दौऱ्यावर निघणार आहेत.

हेही वाचा... कर्नाटक राज्यात 20 डिसेंबरपासून कडक निर्बंध, नववर्षाच्या सेलिब्रेशनवरही बंदी?

मुख्यमंत्र्याच्या दौर्‍यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून याठिकाणी हेलिपॅडवर पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सात तासात पूर्ण केले जाणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सुद्धा आपला शेतमाल मुंबई नाशिकच्या बाजारपेठेत नेता येणार आहे.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा

सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन होईल. हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण होईल. 11.15 वाजता मोटारीने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.

दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण करतील. 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करतील. दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील. औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर गेल्या ऑक्टोबर महिन्यात अस्मानी संकट कोसळलं होतं. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांनी धीर दिला होता.

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. सोलापूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला होता.

हेही वाचा...'या' राज्यात पहिली ते आठवी 31 मार्चपर्यंत शाळा बंद, 10-12वी बोर्ड परीक्षा होणार

सांगवी, अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले होते.

First published:

Tags: Aurangabad, Maharashtra, Udhav thackeray