लॉकडाउनमुळे तळीरामांना सहन होईना, नागपूरमध्ये तीन दिवसांमध्ये फोडली दारूची 3 दुकाने

लॉकडाउनमुळे तळीरामांना सहन होईना, नागपूरमध्ये तीन दिवसांमध्ये फोडली दारूची 3 दुकाने

देशी दारूच्या दुकानाचे शटर तोडून 26 हजाराची दारू चोरून नेली.तर या दुकानातल्या कॅशमधले फक्त 1 हजार रुपये चोरले.

  • Share this:

नागपूर 02 एप्रिल: लॉकडाउनमुळे सध्या मद्यविक्रीची दुकाने बंद आहे़. त्यामुळे तळीरामांच्या संयमाचा बांध सुटतांना दिसून येतोय.दारुड्यांनी नागपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसात तीन बार आणि दारूचे दुकान फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूर शहरातील दोन बार फोडल्यानंतर तळीरामांनी जिल्ह्यातील मौदा शहरालगत असलेल्या देशी दारूच्या दुकानाचे शटर तोडून 26 हजाराची देशी दारू चोरून नेली. विशेष म्हणजे या तळीरामांनी या दुकानातील फक्त 1 हजार रुपये चोरले. इतर ऐवजाला हातही लावला नाही. मात्र, गेल्या काही दिवसापासून दारूची दुकाने बंद असल्यानं मद्यपींचा संयम तुटताना दिसतोय. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे़.

दरम्यान,  दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमधील आयोजित कार्यक्रमात नागपुरातील 54जण सहभागी झाले होते. या सर्व 54 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. जे नागरीक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी स्वत:हून पुढे येत त्याची माहिती द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं.

हे वाचा - मुंबईत धोका वाढला, वरळीनंतर आता सायन कोळीवाड्यात सापडला कोरोनाचा रुग्ण

मुंढे म्हणाले, अशी माहिती मिळाली तर योग्य प्रकारचे उपचार करण्यात येईल जर आपल्याला काही पॉझिटिव्ह सिमटम्स असेल तर लगेच कळवलं पाहिजे. त्यावर लगेच  उपचार होईल व प्रसार होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने कंट्रोल रूम तयार केली आहे.

हे वाचा - 15 एप्रिलनंतर महाराष्ट्रात काय होणार? PM मोदी आणि CM ठाकरे यांच्यात चर्चा

दरम्यान,  दिल्लीतील निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी समोर आली आहे. त्यापैकी 106 जण पुणे विभागात आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 

First published: April 2, 2020, 10:47 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या