Home /News /maharashtra /

LockDown : 15 एप्रिलनंतर महाराष्ट्रात काय होणार? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात झाली चर्चा

LockDown : 15 एप्रिलनंतर महाराष्ट्रात काय होणार? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. यात मुख्यमत्र्यांकडून त्यांनी प्रत्येक राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली.

    मुंबई, 02 एप्रिल : देशात सध्या 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. यात मुख्यमत्र्यांकडून त्यांनी प्रत्येक राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. लॉकडाउनमुळे घरात असलेले लोक ते संपल्यानंतर अचानक रस्त्यावर येतील तेव्हा गोंधळ, गर्दी होऊ नये यासाठी काय करता येईल यावरसुद्धा चर्चा झाली. देशातील लॉकडाउन 14 एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर रस्त्यावर गर्दी होणार नाही यासाठी रणनितीची गरज असल्याचं मोदींनी यावेळी सांगतिलं. मोदी म्हणाले की, लॉकडाउन संपल्यानंतर 15 एप्रिलला लोक लगेच रस्त्यावर आल्यानं गर्दी होणार नाही यासाठी प्रत्येक राज्यानं नियोजन करावं. ठराविक टप्प्यात वसाहती आणि भाग सुरु होतील याची काळजी घ्या. तसंच राज्यातील परिस्थितीवर नियंत्रण कसं करावं यासाठीही मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं. राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी एकदम लॉकडाउन संपवू नये असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. लॉकडाउनंतर काय करायचं य़ावर मुख्यमंत्र्यांनी मोदींना प्रश्न विचारला होता. त्यावर लोक एकदम बाहेर प़डणार नाहीत आणि व्यवस्थेवर ताण येणार नाही याची काळजी घेण्यास मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं. देशातील कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. या लॉकडाउननंतरही देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे लॉकडाउन संपणार की आणखी वाढवण्यात येणार असाही प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. हे वाचा : बापरे! ‘तबलिगी जमात’मुळे तब्बल 400 जणांना कोरोना, देशभर पडला विळखा लॉकडाउन संपणार असल्याचे संकेत मोदींनी दिले असले तरी तो केंद्राचा निर्णय आहे. राज्यांनी मात्र परिस्थिती पाहून पुढचा निर्णय़ घेण्यास मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुर्ववत होण्यासाठी त्यानंतरचे पुढचे काही दिवस मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउन सुरु ठेवला जाण्याची शक्यता आहे. हे वाचा : भयंकर... अमेरिकेत शवपेट्याही पडताहेत अपुऱ्या, दिली लाखभर ‘बॉडी बॅग’ची ऑर्डर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus, PM Narendra Mod, Uddhav thackeray

    पुढील बातम्या