प्रविण तंडेकर, प्रतिनिधी
गोंदिया, 13 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असताना या जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे. अशात गोंदिया जिल्हा परीषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास आणि नीमोनियाचा झाला असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील आठवड्यात कोरोना तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र काल पुन्हा चाचणी केली. आज मृत्यू झाल्यावर अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाबाबत फडणवीस यांच्याशी काय झालं बोलणं? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
तीन महिन्याआधी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सिमा मडावी या पदमुक्त झाल्या होत्या. पण त्यानंतर आता कोरोनाच्या काळात त्यांची तब्येत खालावली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात. कोरोनाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. तर मृत्यू झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता खळबळ उडाली आहे.
लाखो डिव्हाइसेसवर मोठा धोका! तुमचा सगळा डेटा bluetooth मधून हॅकरपर्यंत पोहोचतो
खंरतर, मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका वाढत आहेच. पण ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. वेळीच आरोग्यसेवा उपस्थित न झाल्यामुळे आणि आरोग्य यंत्रणेच्या कमतरतेमुळे रुग्णांचा नाहक बळी जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग पसरल्याचं सेरो सर्व्हेमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
'ठाकरे ब्रँड'वर नितेश राणेंचं सडेतोड उत्तर, 'छत्रपती शिवाजी महाराजां'वरुन ट्वीट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. 12 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. फक्त मुंबई, पुण्यातच नाही तर आता ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus