गडचिरोली, 01 सप्टेंबर : कोरोनाच्या महासंकटात आणखीन एक महापुराचं संकट महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ओढवलं आहे. हिमाचल, बिहार, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ओडिशामधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. महाराष्ट्रातही गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीच्या उत्तर आणि दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी देखील 10 मार्ग पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तर गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यानं अनेक तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनासोबतच ही पूरस्थिती असल्यानं ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे वाचा- मुंबईमध्ये मोठी दुर्घटना; भरधाव कारने अनेकांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू, 4 जखमी देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी व गडचिरोली तालुक्याला जास्त बसला. शेकडो हेक्टरमधील धान्य आणि पीक पाण्याखाली आल्याने शेतक यांची चिंता वाढली आहे. तर वैनगंगेचे पाणी आता प्राणहीता नदीत गेल्याने सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा केला आहे. हे वाचा- JEE आणि NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.नागपूर जिल्ह्यात बचाव पथकांला नागरिकांचे जीव वाचविण्याला मोठे यश आले आहे. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे.