मुंबई, 31 ऑगस्ट : मुंबई शहरात आज पुन्हा एकदा भरधाव कारने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलच्या जवळ एका सुसाट कारने 8 जणांना चिरडलं आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 4 जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. अचानक जनता हॉटेलच्या समोरील रोडवरून वेगात एक गाडी आली आणि तिने हॉटेलसमोर उभा असलेल्या 8 जणांना उडवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
#UPDATE: Four persons dead and four injured after a speeding car ran over them in Crawford market in Mumbai earlier today. Injured are being treated at a hospital. https://t.co/c7BV9UkTEL
— ANI (@ANI) August 31, 2020
घटना घडल्यानंतर कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मुंबईत याआधी देखील अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचंही पाहायला मिळालं होतं.