रवि शिंदे, (प्रतिनिधी) भिवंडी, 21 ऑगस्ट- शहरातील अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कूलच्या पाचव्या मजल्यावरुन 10 वीच्या विद्यार्थिनीने उडी मारली. मोबशिराबानो नुरुद्दीन शेख असे मुलीचे नाव आहे. तिला जखमी अवस्थेत जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, सध्या मोबशिराबानो नुरुद्दीन शेख हिची घटक चाचणी परीक्षा सुरू आहे. परीक्षा झाल्यानंतर मोबशिराबानो हिने हायस्कूलच्या पाचव्या उडी मारली. अभ्यासाच्या तणावामुळे मोबशिराबानो हिने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुण्यात मध्याह्न भोजनातून विषबाधा शालेय पोषण आहारातील जेवण केल्यामुळे कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी विद्यायलायात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ही घटना समोर आली. मध्याह्न भोजन केल्यामुळे उलट्या होऊ लागल्याने 20 विद्यार्थ्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेली माहिती अशी की, मध्याह्न पोषण आहारातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी तातडीने मुलांना उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







