मुंबई, 21 ऑगस्ट : राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल मोठं विधान केलं आहे. ‘मी माझ्या महाराष्ट्रात स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार आहे,’ असं म्हणत नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. नारायण राणे हे काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र युतीत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजपप्रवेश रोखला गेल्याची चर्चा झाली. आता मात्र विधानसभा निवडणुकीआधी राणेंना भाजपमध्ये घेवून कोकणात शिवसेनेलाच शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं दिसत आहे. कारण राणेंचा भाजपप्रवेश व्हावा यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत असल्याचं राणेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच भाजपमध्ये प्रवेश’ भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं पाहून मुख्यमंत्र्यांनी अद्याप राणेंच्या भाजपप्रवेशाला होकार दिलेला नाही. मात्र आता काही दिवसांतच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. राणे कोकणात पुन्हा वर्चस्व मिळवणार? महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हेही वाचा- राज ठाकरेंच्या पाठिशी उद्धव, ED च्या चौकशीवर म्हणाले… कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण युतीमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी राणेंना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







