सरकारच्या कारभारावर नाराज होते DGP, देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा

सरकारच्या कारभारावर नाराज होते DGP, देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा

सुबोधकुमार जैस्वाल हे एक अतिशय कार्यक्षम असे DGP महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, ते राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती मागितली होती.

  • Share this:

नागपूर, 31 डिसेंबर: राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल (DGP Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील सरकार निशाणा साधला आहे.

सुबोधकुमार जैस्वाल हे एक अतिशय कार्यक्षम असे DGP महाराष्ट्राला लाभले होते. मात्र, ते राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारनं मान्य केल्यामुळे ते आता केंद्रात जात आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा....बापरे! स्पीडमध्ये होती एसटी बस, अचानक ब्रेक फेल झाले अन्... पाहा VIDEO

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याप्रकारे राज्य सरकारचा कारभार चालला आहे. त्यावर सुबोधकुमार जैस्वाल नाराज होते. राज्याचे DGP म्हणून त्यांना कुठेही विश्वासात घेतलं गेलं नाही. पहिल्यांदाच राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारच पोलीस विभागाचा कारभार चालवत असल्याचं चित्र दिसत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. पोलिसिंग गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येत असलं तरीही पोलिसिंग एक संपूर्ण स्वतंत्र विभाग आहे. त्याला स्वायत्तता दिली आहे, असाही टोला फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काम हे सुपरवायझरी करण्याच आहे. परंतु आता पोलीस विभागातील अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बादल्यांपासून प्रत्येक ठिकाणी राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे. त्यामुळेच सुबोधकुमार जैस्वाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा..सुबोध जयस्वाल यांच्यानंतर कोण? पोलीस महासंचालकपदाच्या रेसमध्ये 'हे' 4 अधिकारी

महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी परिस्थिती आली आहे की सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे DGP हे प्रतिनियुक्तीवर चालले आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 31, 2020, 12:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या