जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बापरे! स्पीडमध्ये होती एसटी बस, अचानक ब्रेक फेल झाले अन्... पाहा VIDEO

बापरे! स्पीडमध्ये होती एसटी बस, अचानक ब्रेक फेल झाले अन्... पाहा VIDEO

बापरे! स्पीडमध्ये होती एसटी बस, अचानक ब्रेक फेल झाले अन्... पाहा VIDEO

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसची (ST Bus) भरधाव एसटी बसचे अचानक ब्रेक फेल (brakes failed) झाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 31 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसची (ST Bus) भरधाव एसटी बसचे अचानक ब्रेक फेल (brakes failed) झाले. चालकानं प्रसंगावधान दाखवीत सुसाट धावणारी बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका गोदामात घुसवली. त्यामुळ मोठी दुर्घटना टळली. जालना शहरातील (Jalna city) कन्हैय्या नगर जवळील दत्तनगर परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना घडली. हेही वाचा.. राजकारण तापलं! ग्रामपंचायत निवडणुकीवरून रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये जुंपली सदर बस औरंगाबादहून रिसोडकडे जात होती. घटनेच्या वेळी बसमध्ये 15 प्रवाशी होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही. या अपघातात बस आणि गोदमाचं मोठं नुकसान झालं आहे. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच चंदनजीरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

जाहिरात

दरम्यान, मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाटात गुरूवारी पहाटे खासगी बसला भीषण अपघात झाला. बस 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झाल्याचं समजतं. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा… 2021 मध्ये अर्थव्यवस्थेत तेजीची आशा, या 5 क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळालेली माहिती अशी की, ही बस मुंबईहून देवगडला जात होती. कशेडी घाटात भोगावजवळ बस पोहोचली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 50 फूट खोल दरीत कोसळली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात