नागपूरला हाय अलर्ट, ‘मरकज’हून परतलेले 54 जण क्वारंटाइन

नागपूरला हाय अलर्ट, ‘मरकज’हून परतलेले 54 जण क्वारंटाइन

या कार्यक्रमातदेशातल्या अनेक राज्यांमधून लोक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • Share this:

नागपूर 1 एप्रिल : दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमधील आयोजित कार्यक्रमात नागपुरातील 54जण सहभागी झाले होते. या सर्व 54 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांची तपासणी सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. जे नागरीक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी स्वत:हून पुढे येत त्याची माहिती द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं.

मुंढे म्हणाले, अशी माहिती मिळाली तर योग्य प्रकारचे उपचार करण्यात येईल जर आपल्याला काही पॉझिटिव्ह सिमटम्स असेल तर लगेच कळवलं पाहिजे. त्यावर लगेच  उपचार होईल व प्रसार होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने कंट्रोल रूम तयार केली आहे.

दरम्यान,  दिल्लीतील निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी समोर आली आहे. त्यापैकी 106 जण पुणे विभागात आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिली.

हेही वाचा - गावी पोहोचण्यासाठी 2 तरुण आणि 7 तरुणींनी केला 'गनिमी कावा',पोलीसही झाले हैराण

डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत.

हेही वाचा...हा VIDEO पाहून सुप्रिया सुळेंनी केलं पुणे पोलिसांचं कौतुक

182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करुन त्यातील 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. त्या स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलिस तपासात आढळून आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 05:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading