बुलडाणा: ट्राफिक हवालदारांनी घेतली 50 रुपयांच लाच, पोलीस अधिक्षकांनी वाहतूक शाखाच केली बरखास्त

बुलडाणा: ट्राफिक हवालदारांनी घेतली 50 रुपयांच लाच, पोलीस अधिक्षकांनी वाहतूक शाखाच केली बरखास्त

पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी आपला युनिफॉर्म परिधान करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

  • Share this:

बुलडाणा 09 सप्टेंबर: ट्राफिक पोलीस हवालदारांनी 50 रुपयांची लाच घेतली आणि त्यांची शिक्षा सगळ्या वाहतूक शाखेलाच भोगावी लागली. बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून पोलीस अधिक्षकांनी केलेल्या या कावाईमुळे पोलीस दलातखळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पुढील आदेशापर्यंत जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बुलडाणा शहरात तीन वाहतूक शाखा पोलीस कर्मचाऱ्यांना 50 रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली होती.

या करवाईमुळे जिल्हा पोलीस वाहतूक शाखेची प्रतिमा मालिन झाली होती. त्यामुळे ती प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी तात्काळ हा आदेश काढला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी News 18 लोकमत सोबत बोलतांना दिली

पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी आपला युनिफॉर्म परिधान करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले असून जिल्ह्यातील चेक पोस्ट ही बंद करण्यात आल्या आहेत.

टीव्हीवरील 'नागिन'चा बोल्ड अंदाज; सुरभि ज्योतिचे PHOTO पाहून दिवाने व्हाल

जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी मुख्यालयाला संलग्नित केले असून जिल्ह्यातील इतर वाहतूक पोलिसांना आपापल्या पोलीस स्टेशनला जोडण्यात आले आहे.

नोकरीचं आमिष दाखवून तरूणीवर सामुहिक बलात्कार, अमरावतीमधली संतापजनक घटना

पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी जिल्ह्यात पोलीस विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आलेत मात्र या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या करवाईमुळे सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 9, 2020, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading