अमरावती 09 सप्टेंबर: अमरावती पोलीस आयुक्तालयातील बडनेरा शहर हे सध्या गुन्हेगारीचे माहेर घर ठरले असून आज एका युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याने शहरात खळबळ उडाली. 30 वर्षीय युवतीला रोजगाराचे आमिष दाखवून भेटायला बोलावलं आणि चौघांनी सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातून महीला आणि बाल कल्याण मंत्री आहेत. अमरावतीच्या खासदारही महीला आहेत. त्याचबरोबर महिला पोलीस आयुक्तही आहेत असं असतांनाही महिलांवरचे अत्याचार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरा लगत असलेल्या बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतशीवारात ही घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी चार नराधमांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली आहे तर एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सूरु आहे..
सुनील विष्णु राठोड (वय 27),दिनेश पानसिंग जाधव (वय 30), रतन अवधूत पाटील (वय 25 )व समिर असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील समीर नावाचा आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
प्रेयसीची गळा कापून हत्या, रक्तानं माखलेला सुरा घेऊन आरोपीनं गाठलं पोलीस स्टेशन
पीडित तरुणी ही अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका खेड्या गावात राहणारी आहे. मागील काही महिन्यांपासून रोजगारासाठी ती अमरावती शहरात भाड्याने राहते. दरम्यान, मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी एका कापड दुकानात ती कामाला होती. याच दुकानात काम करणाऱ्या समीर या तरुणाशी पीडित तरुणीची ओळख झाली. मात्र काही कारणामुळे या तरुणीने दुकानात काम करणे बंद केले.
त्यानंतर समीरने त्या पीडितेला फोन करून तुला दुसऱ्या दुकानात काम देतो असे सांगून तिला अमरावती मधील एका मुख्य चौकात बोलावून घेतले.
ज्या दुकानदाराला आपल्याला भेटायचे आहे त्याला यायला वेळ आहे. तो पर्यंत आपण माझ्या भानखेड येथील शेतातून परत येऊ असे सांगून समीरने तिला शेतात नेलं. समीर व्यतिरिक्त तीन आरोपी हे आधीच शेतात पोहचले होते. शेतात पोहचताच या चौघांनी या तरुणीवर रात्री आठ वाजेपर्यंत सामूहिक अत्याचार केला. रात्री या युवतीने कशीबशी आपली सुटका करून घेतली.
मोबाईलसाठी तो रक्ताचं नातंही विसरला, आईने दार उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
आणि पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. त्यांतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू ,घुटका विक्री व गुन्हेगारी वाढायला लागल्याने नव्यानेच पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या आयुक्त आरती सिंग यांच्या समोर आव्हान निर्माण झालं आहे.