गुजरातमध्ये जे झालं त्याची आठवण ठेवा, वारिस पठाणला भाजप नेत्याचा इशारा

गुजरातमध्ये जे झालं त्याची आठवण ठेवा, वारिस पठाणला भाजप नेत्याचा इशारा

'आम्ही सहिष्णू आणि शांत आहोत त्याचा गैरफायदा घेऊन पठाण यांनी तेढ निर्माण करू नये.'

  • Share this:

नागपूर 22 फेब्रुवारी : AMIMचे नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तयार झालेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. पठाण यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होत आहे. भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी तर वारिस पठाण यांना थेट इशाराच दिलाय की, पठाण यांनी गुजरातमध्ये जे काही झालं त्या घटना विसरून जाऊ नयेत. आम्ही सहिष्णू आणि शांत आहोत त्याचा गैरफायदा घेऊन पठाण यांनी तेढ निर्माण करू नये असंही व्यास यांनी म्हटलं आहे. देशातले 15 कोटी मुस्लिम हे 100 कोटी हिंदूंना भारी पडतील असं वक्तव्य पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गा इथं एका जाहीर सभेत केलं होतं. पठाण AMIMचे माजी आमदार असून 2014च्या विधानभा निवडणुकीत ते मुंबईतल्या भायखळ्यातून निवडून आले होते.

पक्षाने सांगितलं तोंड बंद ठेवा

15 कोटी 100 कोटींना भारी पडतील असं वक्तव्य करून वाद निर्माण करणारी वारिस पठाण यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची खप्पामर्जी ओढवलीय. पठाण हे AMIMचे महाराष्ट्रातले नेते आणि माजी आमदार आहेच. पठाण यांच्या वक्तव्यामुळे ओवेसे हे अत्यंत नाराज आहेत. पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश पसरतो अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आलीय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पठाण हे विजयी झाले होते. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

माझ्या मुलीला वाचवा! भरसमुद्रात अडकली महाराष्ट्राची लेक; PM ना बाबांचं साकडं

काय बोलले वारिस पठाण?

"15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना!" असं म्हणत मुस्लीम समुदायापुढे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर टीका होत आहे. कर्नाटकात गुलबर्गा इथल्या पठाण यांच्या भाषणाचा VIDEO माध्यमांमधून फिरत आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याची शक्यता असणारी वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी या भाषणात केली.

CAAवरून काँग्रेसने साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

"इट का जवाब पत्थर से' हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या', अशी चिथावणीखोर भाषा वापरत MIM चे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त भाषण केलं.  All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)चे नेते वारिस पठाण माजी आमदार आहेत. मुंबईतल्या भायखळा मतदारसंघातून ते गेल्या विधानसभेत निवडून आले होते.

First published: February 22, 2020, 2:12 PM IST

ताज्या बातम्या