वर्धा, 1 मार्च : हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभराची जमापूंजी अचानक आगीत भस्म झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वर्ध्यातील एका गावातील (Wardha) आगीची घटना ताजी असताना आता हिंगणघाट तालुक्यात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून पशूधन, शेतातील पीक आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ शिवारातील काजळसरा येथील लक्ष्मीकांत पंढरीनाथ देवतळे या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. शेतीमधील सहा क्विंटल सोयाबीनसह बैलजोडी, गाई, शेतीची अवजारे जळून खाक झाली आहे. शेतीपयोगी साहित्य आणि पशुधन गेल्याने शेतकऱ्याला सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले आहे. (Ashes the lifelong capital of Devatala in a few minutes; The farmer was shaken by the accident in Hinganghat)
हे ही वाचा-कुठे अवकाळी तर कुठे गारपीट, वाचा कोणत्या जिल्ह्यांना बसला सर्वाधिक फटका
हिंगणघाट तालुक्यात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून पशूधन, शेतातील पीक आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. pic.twitter.com/mgId3WPYs2
— News18Lokmat (@News18lokmat) March 1, 2021
शेतकऱ्याचं मोठं नुकसान
बैलजोडी, दोन गायी, एक कुत्रा आणि 60 कोंबड्या जळून खाक झाल्या आहेत. तर याशिवाय आगीमध्ये शेतमालातील हळदीचे 10 पोते ,सोयाबीन 5 पोते, युरिया 10 बॅग मोठं नुकसान झालं आहे. गेल्या अनेक दिवसात शेतात आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वर्ध्याच्या गोल बाजारातील दुकानांना आग लागण्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता हिंगणघाट तालुक्यात शेतातील गोठ्याला आग लागून पशुधन, शेतीपीक आणि शेतातील मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान विदर्भात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचं समोर आलं आहे. नागरिकांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा भोवतो आहे. त्याचवेळी कोरोनासंबंधी नियमांचं पालन करणं बंधनकारक असताना, ते मात्र कुणी पाळताना दिसत नाही. कोरोना रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे. पण मास्क न घालताच लोक बिनधास्तपणे फिरत आहेत. बाजारात जातानाही मास्क लावला जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.