मुंबई, 05 सप्टेंबर : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत तर 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.
An earthquake of magnitude 2.7 occurred 98 km north of Mumbai, Maharashtra at 6:36 am today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) September 5, 2020
हे वाचा- LIVE : यवतमाळमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसांत 9 रुग्णांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती . शुक्रवारी मध्यरात्री 11.41 च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली. याआधी मागच्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.