मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अकोल्यात शिवसेना नगरसेवकाचा राडा, सभेत खुर्च्यांची तोडफोड

अकोल्यात शिवसेना नगरसेवकाचा राडा, सभेत खुर्च्यांची तोडफोड

फेकलेली एक फाईल एका नगरसेविकेला लागत होती. परंतु, त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्या थोडक्यात वाचल्या.

फेकलेली एक फाईल एका नगरसेविकेला लागत होती. परंतु, त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्या थोडक्यात वाचल्या.

फेकलेली एक फाईल एका नगरसेविकेला लागत होती. परंतु, त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्या थोडक्यात वाचल्या.

अकोला 28 फेब्रुवारी : अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी व सभापती कडून योग्य उत्तर न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज खुर्च्या आणि फाईलची फेकाफेक केली. या गदारोळात सेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. दरम्यान, नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेमध्ये अधिकारी व सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अकोला महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती विनोद मापारी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झाली. यामध्ये हा सगळा राडा झाला.

यासभेमध्ये पहिल्या प्रश्नानंतर दुसऱ्या प्रश्नाचे वाचन नगर सचिव यांनी केले. त्या प्रश्नावर शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी आक्षेप घेतला. महानगरात विद्युत साहित्य तसेच एलईडी लाईट मिळत नसल्यामुळे नागरिक वारंवार प्रश्न विचारत आहे. शहरातल्या अनेक भागात अंधार आहे. हा अंधार दूर करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कुठलाच योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी केला.

कोरोनाचा फटका, महाराष्ट्रातले 600 भाविक इराणमध्ये अडकले

विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं सेनेचे नगरसेवक काळे यांनी सभागृहात म्हटलं. सभापती मापारी यांनी नगरसेवक काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगेश काळे यांनी सभापती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप करीत खुर्च्या व फाईल यांची फेकाफेक केली. फेकलेली एक फाईल एका नगरसेविकेला लागत होती. परंतु, त्यांनी स्वतःचा बचाव केल्याने त्या थोडक्यात वाचल्या. या प्रकारानंतर सेनेचे नगरसेवक मंगेश काळे यांनी स्थायी समितीच्या सभेत मधून सभात्याग केला.

हेही वाचा...

अवघ्या काही मिनिटांत द्राक्ष बागा उद्धवस्त, उस्मानाबाद जिल्ह्यात टोळीचा हैदोस

वाघिनीने केली गायीची शिकार, पहा Live थरारक Photos

10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

First published:

Tags: Akola mahapalika, Akola muncipal corporation