टिपेश्वर अभियारण्याला लागून असलेल्या सुन्ना गावापरिसरात वाघिणीने हल्ला करून गाई आणि बैल ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना शेतकऱ्याच्या डोळ्या समोर घडली.
टिपेश्वर अभयारण्य परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथले शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.
यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.