मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीयांसाठी क्रिकेटचा देव. आजही मैदानात कोणताही सामना असो सचिन...सचिन....सचिनचा आवाज स्टेडियमभर घुमतो.
2/ 7
20 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर 2012मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून तर 2013मध्ये कसोटीमधून सचिनने निवृत्ती घेतली. मात्र आजही सचिनचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.
3/ 7
अशाच एका 10 महिन्याच्या चिमुरड्याची इंटरनेटवर चर्चा आहे. 10 महिन्याच्या श्रेशथचे फोटो पाहून सचिनही भावूक झाला.
4/ 7
सचिनने हे फोटो ट्वीट करत, या मुलात स्वत:ची छबी दिसल्याचेही सांगितले. या मुलाच्या बाबांनी हे फोटो शेअर केले.
5/ 7
या फोटोमध्ये हा चिमुरडा सचिनच्या 10 क्रमांकाच्या जर्सीसोबत, किट बॅग, पॅड आणि बॅट घेऊन उभा आहे.
6/ 7
सचिनने या चिमुरड्याचे फोटो शेअर करताना क्रिकेट खेळण्यासाठी वय नसते, असे कॅप्शन सचिनने दिले आहे.
7/ 7
सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही चॅरिटी मालिका खेळणार आहे. यात ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज खेळाडू असणार आहे.