मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विदर्भ तापणार! 72 तासात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याचा इशारा

विदर्भ तापणार! 72 तासात उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याचा इशारा

Heat Wave: मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच विदर्भात उष्णतेचो लाट जाणवेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 डिग्रीने वाढेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 30 मार्च:  संपूर्ण राज्यात सूर्यनारायणाचा प्रकोप जाणवू लागला आहे. उकाडा असह्य होत असल्याने अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. पाच मिनिटं बाहेर पडलं की अंग घामाने फार भिजून जातं. चंद्रपूर (Chandrapur), सोलापूर (Solapur), जळगाव (Jalgaon) या ठिकाणी तर पारा 40 अंश डिग्री पार गेला आहे. मार्च अखेरीस इतका उकाडा वाढला आहे, तर एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती कशी असेल याबाबत विचार न केलेलाच बरा होईल.

मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच विदर्भात उष्णतेची लाट जाणवेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 डिग्रीने वाढेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. विदर्भामध्ये पुढची तीन दिवस हीट वेव राहणार असून या पार्श्वभूमीवर नागपूर वेध शाळेने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबई-गोवा हायवेवर दोन कारची समोरासमोर धडक; शिमग्याच्या पालखीसाठी जाताना अपघात

राज्यस्थान, गुजरातकडून येणारे उत्तर पश्चिमी कोरडे वारे हे महाराष्ट्रात येत असल्याने विदर्भातले तापमान वाढले आहे. सोमवारी विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरीत 43.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून बहुतांश शहराचे तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर होते. पु ढील काळात या तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोस्टल एरिया अर्थात कोकण गोव्यातही  उष्णेतीची लाट जाणवेल अशी माहिती पुणे वेधशाळेचे संचालक अनुपम काश्यपी यांनी दिली.

पुण्यात लवकरच पारा चाळीशी ओलांडणार

सध्या पुण्याचं तापमान 38 डिग्री आहे.मात्र 2 एप्रिलला तापमान 40 च्या वर पोहोचेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर 31 मार्च आणि 1 एप्रिलला तापमान 39 डिग्रीवर राहील असं वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईकरांना थोडा दिलासा मिळणार

मुंबईत 1 एप्रिलनंत 5 एप्रिलपर्यंत तापमान 31 डिग्री इतकं राहील. म्हणजे तापमानाच्या तुलनेत 2 डिग्रीने तापमानात घट होणार आहे.

कोरोनाचं सावट असल्याने तोंडाला लावलेलं मास्क यामुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. त्यात कोरोनामुळे बाहेरचं पाणी, ज्यूस आणि सरबत पिण्याचीही भिती असल्याने  जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर पडणं गरजेचं असल्यास भरपूर पाणी प्या, डोके टोपी किंवा सुती कपड्याने झाका जेणेकरून उन्हापासून बचाव करता येईल.

First published:

Tags: Hot