मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांचं निधन

'मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगतदार आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची 'मिरासदारी' अबाधित राहील'

'मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगतदार आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची 'मिरासदारी' अबाधित राहील'

'मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगतदार आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची 'मिरासदारी' अबाधित राहील'

chपुणे, 02 ऑक्टोबर : ज्येष्ठ साहित्यिक आणि विनोदी लेखक प्राध्यापक द.मा.मिरसदार (D M Mirasdar) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Veteran writer D M Mirasdar passed away )

द.मा. मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 साली झाला. साहित्य क्षेत्रात येण्याआधी ते पुण्यात पत्रकार होते. अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले होते. त्यानंतर 1961 ते 1987 पर्यंत औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

दरेकर-सोमय्यांना घरी बोलावलं होतं का? रामदास कदम म्हणाले...

1950 मध्ये सत्यकथा मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या रानमाणूस या पहिल्या कथेपासून त्यांनी लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली होती. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही गाजवली होती.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, द. मा मिरासदार यांच्या निधनाचे वृत्त  समजले अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे  कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच  होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची  पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल. 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी 1927 साली त्यांचा जन्म झाला आज 94 व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी भावना व्यक्त केली.

"'द. मा'.म्हणजे ग्रामीण रंगढंगबाज विनोदाची मिरासदारी"

मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगतदार आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची 'मिरासदारी' अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

'द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरिक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे मिरासदार यांनी आपली अशी 'मिरासदारी' निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

First published: