Home /News /maharashtra /

पिंपरीत पोलीस ठाण्याच्या आवारातच वाहनांना अचानक लागली आग, परिसरात भीतीचं वातावरण

पिंपरीत पोलीस ठाण्याच्या आवारातच वाहनांना अचानक लागली आग, परिसरात भीतीचं वातावरण

काही वेळानंतर स्फोट होऊ लागल्याने परिसरात भीतीचं वातवरण निर्माण झाले होते.

पिंपरी, 9 नोव्हेंबर : पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीत 7 ते 8 वाहने जळून खाक झाली आहेत. तर, काही वेळानंतर स्फोट होऊ लागल्याने परिसरात भीतीचं वातवरण निर्माण झाले होते. पिंपरी पोलीस ठाणे हे अत्यंत वर्दळीच्या महामार्गावर आहे. बाजुलाच चिंचवड स्टेशन चौक असून काही अंतरावर पेट्रोल पंप देखील आहे. या आगीमुळे अन्य नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याठिकाणी सुमारे 50 चारचाकी वाहने लावलेली आहेत. तर, सुमारे 100 हून अधिक दुचाकी वाहने आहेत. ही सर्व वाहने बेवारस, विविध गुन्हेगारी कृत्यासाठी वापरण्यात आलेली असल्याने जप्त केलेली आहेत. मोटारी आणि दुचाक्या असल्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने स्फोट होत आहेत. आगीने रौद्ररुप धारण केले असून आगीवर नियंत्रण घेण्यासाठी अग्निशामक दलाचे 3 बंब घटनास्थळी रावाना झाले आहेत. हेही वाचा- रत्नागिरी बस कंडक्टर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, भावाचा गंभीर आरोप दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. शॉट सर्किटमुळे ही आग लागली की समजकंटकांकडून हा प्रकार करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Fire, Pimpari, Pimpari chinchawad

पुढील बातम्या