Home /News /crime /

रत्नागिरी बस कंडक्टर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, भावाचा गंभीर आरोप

रत्नागिरी बस कंडक्टर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, भावाचा गंभीर आरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील बस आगारात कंडक्टर पांडुरंग गडदे (Pandurang gadde suicide case) आत्महत्या प्रकरणाला नवीन मिळाले आहे.

    रत्नागिरी, 09 नोव्हेंबर : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या  बस (Maharashtra State Road Transport Corporation)  आगारात कंडक्टर पांडुरंग गडदे (Pandurang gadde suicide case) आत्महत्या प्रकरणाला नवीन मिळाले आहे. गडदे यांनी आत्महत्या केली नसून हत्याच आहे, असा दावा गडदे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. पांडुरंग गडदे यांच्या शरीरावर अनेक जखमा सुद्धा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पांडुरंग गडदे या एसटी वाहकाच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली. 8 नोव्हेंबर रोजी गडदे यांचा मृतदेह खोलीमध्ये आढळून आला होता. पण, आपल्या भावाने आत्महत्या केलेली नसून त्याचा घातपात झाला असल्याचा दावा मृत पांडुरंग गडदे यांच्या भाऊ शंकर गडदेने केला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याचे म्हटलं होतं. पण रत्नागिरीत दाखल झालेल्या गडदे यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची पाहणी केली असता आणि पोलिसांकडील फोटो पाहिले असता पांडुरंग याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. पांडुरंग यांच्या शरिरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. तसंच मृत्यूसमयी जमिनीला पाय टेकलेल्या आणि निवर्स्त्र अवस्थेत दाराच्या चौकटीला फास लावल्या स्थितीत  त्यांचा मृतदेह आढळून आला, असा दावा गडदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत गडदे कुटुंबीयांनी रत्नागिरी पोलिसांकडे तक्रारही करणार आहे.  काय आहे प्रकरण? 8 नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे रूमचे पार्टनर पी.ए.तांदळे हे गडवे यांना उठवण्यासाठी गेले होते. रूमचा दरवाजा वाजवल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यामुळे तांदळे यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता पांडुरंग गडदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या