जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

भाज्या खराब झाल्याने आवक घटली आहे, याचा परिणाम दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाण्यासह उपनगरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 28 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील अनेक भागात थैमान घातलं. या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतातील भाज्यांचंही यात मोठं नुकसान झालं आहे. भाज्या खराब झाल्याने आवक घटली आहे, याचा परिणाम दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाण्यासह उपनगरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. दिवाळीनंतरही सोन्याचे दर चढेच राहणार? काय सांगतोय बाजाराचा मूड पावसामुळे शेतातील भाज्यांचं नुकसान झाल्याने दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईत आता पुन्हा झळ बसत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या शहरांमध्ये गवार, फ्लावर, शिमला मिर्ची, भेंडी, कोबी, वांगी अशा भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाज्यांचं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचून दलदलीसारखी स्थिती असल्याने भाजीपाला सडलाही आहे आणि भाज्या काढण्यासही अडचणी येत आहेत. भारतातील श्रीमंतांची ‘सेकंड होम’ म्हणून दुबईला पसंती; वाचा यामागचं कारण आता नवीन भाज्या तयार होऊन बाजारात येण्यात किमान एक ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे आवक सुरळित होईपर्यंत भाज्यांचे दर चढेच राहाण्याची शक्यता आहे. नवीन भाजीपाला बाजारात दाखल झाल्यानंतर हे दर कमी होण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासाठी सर्वसामान्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात