मुंबई, 10 मे : येत्या 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
(Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) अयोध्या
(Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला
उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह
(BJP MP Brij Bhushan Shran Singh) यांनी विरोध दर्शविला आहे. बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे.
बृजभूषण सिंह यांचे काय म्हणणे आहे -
राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली. महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि त्यानंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे, या शब्दात खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर अयोध्येतील जनता, साधू संत राज ठाकरेंवर नाराज आहे, असेही ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन तापलं राजकारण, शिवतीर्थावर घडामोडींना वेग
राम मंदिर आंदोलनामध्ये ठाकरे परिवाराचा कोणताही सहभाग नव्हता. त्यांचं या आंदोलनाशी काहीही घेणे देणे नाही, राम मंदिर उभारणीमध्ये कोणताही वाटा नाही, अशी टीकाही बृजभूषण सिंह यांनी केली, असं वृत्त
लाईव्ह हिंदूस्थानने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.