Home /News /maharashtra /

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन तापलं राजकारण, शिवतीर्थावर घडामोडींना वेग

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन तापलं राजकारण, शिवतीर्थावर घडामोडींना वेग

सोमवारी मुंबईतील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे (MNS) प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दौऱ्याचं नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 09 मे: येत्या 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी मुंबईतील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे (MNS) प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दौऱ्याचं नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून वादविवादांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. सिंह यांच्या मागणीला मनसेच्या नेत्यांकडूनही प्रतिआव्हान देण्यात आलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरेही अयोध्या दौऱ्यावर शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि पर्यावरण मंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) येत्या 10 जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील त्यांच्या सोबत असणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी अयोध्यामध्ये पोस्टरवरून सुरू झालेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ट्विट करून घोषित केली आहे. येत्या 10 जून रोजी शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत शिवसेनेची मनसेविरोधात खोचक पोस्टरबाजी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत (Ayodhya) शिवसेनेकडून (Shiv Sena) पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'असली येत आहे, नकली पासून सावधान', अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधी आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून अयोध्या शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांवर NIA ची मोठी कारवाई, मुंबईत 20 ठिकाणी छापे राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून त्यासाठी जोरदार तयारी देखील केली जात आहे. अयोध्याला जाण्यासाठी मनसेकडून 10 ते 12 रेल्वेगाड्या बुक केल्या जाणार असल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे देखील अयोध्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून मनसेला खोचक टोला लगावणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'आम्हाला डिवचणाचा प्रयत्न करू नका', मनसेचा इशारा शिवसेनेच्या टीकेवर मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "कोण असली, कोण नकली हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. तुम्ही हिरवा हातात घेतलाय, सत्तेसाठी हिंदूत्व लाथाडलेलं आहे. तुमचं हिंदूत्व नकली आहे. राज ठाकरे यांचे हिंदूत्व सोन्यासारंख अस्सल आहे. तुम्ही नका ठरवू, आम्हाला डिवचणाचा प्रयत्न करू नका", असा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या