ठाणे, 31 जुलै : तब्बल 4 महिन्यांनी राज्यातील मॉल्स सुरू होतील. राज्य सरकारने तसे आदेश जारी केले आहेत. पण ठाण्यात मात्र मॉल सुरू होणार नाहीत. कारण तसे आदेश ठाणे महानगरपालिकेने जारी केले आहेत. मॉलसोबतच ठाणे महानगरपालिका हद्दीतील जीम, स्वीमिंग पूल, भाजी मार्केट आणि बाजारपेठा देखील सुरू न करण्याचा निर्णय ठाणे मनपाने घेतला आहे. त्यामुळे अनलॉक 3 नुसार मॉल, जीम, स्वीमिंग पूल, बाजारपेठा आणि मार्केटवाल्यांनी सर्व तयारी करुन देखील ठाण्यात हे काहीच सुरु होणार नाही, असं चित्र आहे. नुकतीच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कशी काळजी घेतली गेली आहे…आलेल्या लोकांमध्ये सोशल डिस्टन्स राहावे, गर्दी होवू नये, पी 1 - पी 2 चा नियमाचे पालन, येणा-या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजणे, ॲाक्सिजन पातळी तपासणे याशिवाय प्राथमिक उपचार यासर्वची सोय ठाण्यातील विवियाना मॉलसह इतर मॉलमध्ये करण्यात आली होती. मात्र ठाणे महानगरपालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आदेशामुळे तुर्तास तरी ठाण्यात तरी मॉल जीम, स्वीमिंग पूल, बाजारपेठा आणि मार्केट सुरू होणार नाहीत. दरम्यान, दुसरीकडे पुण्यात मात्र मॉल सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे. पुण्यामध्ये मॉल्स आणि व्यापारी संकुले 5 ऑगस्ट पासून सकाळी 9 ते 7 खुली राहतील. मात्र मॉल्समधील हॉटेल्स ,रेस्टरन्ट ,सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. तर हॉटेल्स, रेस्टरन्टमधून खाद्यपदार्थ घरपोच पाठवता येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.