जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं!

पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं!

पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं!

Crime In Satara: कराड तालुक्यातील मालखेड याठिकाणी नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत (Dead body found in river) आढळला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कराड, 17 नोव्हेंबर: सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड याठिकाणी हत्येचं (Murder in karad) सत्र सुरूच आहे. गेल्या महिन्यात कराडमध्ये हत्येच्या बऱ्याच घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर आता कराड तालुक्यातील मालखेड याठिकाणी नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत (Dead body found in river) आढळला आहे. स्थानिक मच्छिमार नदीत मासेमारी करायला गेल्यानंतर, हा प्रकार उघडकीस आला आहे. नदीपात्रात पोत्यात काहीतरी असल्याचा संशय येताच, मच्छिमारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संबंधित मृतदेह एका पुरुषाचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. चार पाच दिवसांपूर्वी त्यांची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी काही पुरावे सापडतात का? यासाठी पोलीस पथक कसून शोध घेत आहेत. हेही वाचा- पाइपनं मारल्याचा बदला गोळी मारून घेतला; नगरमध्ये सख्ख्या भावांत तुंबळ हाणामारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील मालखेड याठिकाणी बुधवारी सकाळी काही स्थानिक मच्छिमार मासेमारी करण्यासाठी नदी पात्रात गेले होते. यावेळी त्यांना नदीपात्रात एक पोतं संशयास्पद स्थितीत पडल्याचं आढळलं. संशय आल्यानं मच्छिमारांनी तातडीनं या घटनेची  माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. हेही वाचा- कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, संबंधित मृतदेह पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. अंगावरील कपड्यांसह अन्य बाबीद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. प्रथमदर्शनी संबंधित घटना घातपाताची असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध शक्यता लक्षात घेऊन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात