अहमदनगर, 17 नोव्हेंबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) याठिकाणी दोन सख्ख्या भावांची तुंबळ हाणामारी (2 brothers fighting) झाल्याची घटना समोर आली आहे. काष्टी येथील रुग्णालयासमोर कार पार्क केल्याच्या कारणातून (Dispute over car parking) दोघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली आहे. या हाणामारीत एका भावाने दुसऱ्याच्या डोक्यात पाईपनं मारहाण (Attack with pipe) केली आहे. तर दुसऱ्याने थेट सख्ख्या भावावर बंदुकीतून गोळी झाडली (Gun firing) आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित भावाच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांन देण्यात आली आहे. मनोज मुनोत असं गोळीबारात जखमी झालेल्या भावाचं नाव आहेत. तर डॉ. विजय मुनोत असं गोळीबार करणाऱ्या भावाचं नाव आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी मनोज मुनोत यांनी भाऊ डॉ. विजय मुनोत यांच्या रुग्णालयासमोर आपली गाडी पार्क केली होती. पण मुनोत बंधुंमध्ये गेल्या काही वर्षांपासून संपत्तीचा वाद होता. त्यामुळे विजयने मनोज याला रुग्णालयासमोरील गाडी का लावली असा जाब विचारला. हेही वाचा- सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा LIVE VIDEO यातूनच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. बाचाबाचीने सुरू झालेला वाद काही क्षणातच विकोपाला गेला. यावेळी संतापलेला भाऊ मनोज याने विजयच्या डोक्यात पाइपने जबरी मारहाण केली. यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी आपल्या बंदुकीतून भाऊ मनोज याच्यावर गोळीबार केला. या थरराक घटनेत मनोजच्या पायाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. हेही वाचा- VIDEO: लखनऊनंतर दिल्लीतही कॅबचालकाला मारहाण;महिलेनं भररस्त्यात लगावल्या कानशिलात जखमी मनोज यांना उपचारासाठी दौंड याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादानं भावांनी एकमेकांना केलेल्या मारहाणीमुळे परिसरात एकच खबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पहाणी केली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.