जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

Go Corona Goची घोषणा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना झाला कोरोना

रामदास आठवले यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो (Corona Go Go Corona) अशी घोषणा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale)यांना कोरोनाची लागण (Corona Test) झाल्याची माहिती मिळाली आहे. अभिनेत्री पायल घोष हिला रिपाइं पक्षात प्रवेश देण्यासाठी सोमवारी आठवलेंनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी आठवले यांनी चेहऱ्यावर अर्धवट मास्क घातला होता. त्याचं तोंड व नाक दोन्ही खुले होते. मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवले यांनी स्वतः ला होम क्वारंटाइन केलं आहे. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची सोमवारी कोरोना टेस्ट झाली होती. डॉक्टरांनुसार, त्यांची प्रकृती स्थीर आहे. यामुळे सध्या त्यांना घरीच राहण्याचे सांगितले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आठवले यांनी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. हेही वाचा… महाविकास आघाडीत 12 जागांसाठी चुरस? उद्या कॅबिनेटची महत्त्वाची बैठक म्हणून घोषणा आठवली… चीनमध्ये कोरोना आला होता, त्यामुळे कोरोना गो ही घोषणा मला आठवली होती, असं रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. माझं नाव आठवले असल्याने मला योग्य गोष्टी योग्य वेळी आठवतात, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिलं होतं. या घोषणेमुळे माझं नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचंलं असल्याचं ते म्हणाले होतं. दरम्यान, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या ओसरली असली तरी काळजी न घेतल्यास कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी भीती केंद्रीय आरोग्य विभागानं वर्तवली आहे. अजितदादांच्या पाठोपाठ आणखी एका खासदाराला कोरोना दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे (NCP) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनाही कोरोनाची लागण (Corona Test) झाल्याचे समोर आले आहे. उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता याच हॉस्पिटलमध्ये तटकरे यांनाही दाखल करण्यात आले आहे. ‘सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद यांच्या बळावर लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू होईन’, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… कोरोना लस मोफत! BJP चा चुनावी जुमला, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या संतापल्या अजित पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली होती. तसंच, ‘राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’ असंही अजित म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात