मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील एका शहरालाही मिळणार दिलासा

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा महत्त्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्रातील एका शहरालाही मिळणार दिलासा

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नाशिक, 20 एप्रिल: देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रकोप वाढत असून आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत. लोकांना जिवंतपणी प्राणवायू आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत, तर जीव गमावल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीत काहीशी सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

देशातील फक्त आर्मी राखीव हॉस्पिटलमध्ये विशेष कोविड वॉर्ड निर्मिती करण्यात येणार आहे. यात सर्वसामान्य नागरिकांवरही उपचार होतील. लखनौ, पटना, अहमदाबाद, नाशिक यासह देशातील काही शहरात हे हॉस्पिटल्स आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने कोविड आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आर्मीकडून मदतीचा हात मिळणार आहे. याबाबत राजनाथ सिंह यांनी डिफेन्स सेक्रेटरीला आदेश दिले आहेत.

DRDO आणी HAL यांच्या कॅम्पसमध्ये ही कोविड हॉस्पिटल्स उभारणीचं काम जलदगतीने सुरू झालं आहे. देशातील आर्मीच्या 63 हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत दिल्या जाणाऱ्या DRDO फॅसिलिटी आधारावर 63 हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्डची उभारणी केली जाणार आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच

दरम्यान, देशात ज्याप्रमाणे कोरोनाची पहिली लाट ओसरली तशी आता दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. पण तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन आठवडे खूप महत्त्वपूर्ण आहेत.

कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार याबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांच्या मते, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम पाळावे लागतील.

First published:

Tags: Maharashtra, Modi government, Mumbai, Nashik, Rajnath singh, Uddhav thackeray