मोठी बातमी! Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच

मोठी बातमी! Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच

मृतांचे आकडे चिंता वाढवत असतानाच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला अद्याप अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने 8 लाख रेमडेसिवीर औषध मात्रांसाठी काढलेल्या निविदा (टेंडर) कडे औषध कंपन्यांनी पाठ फिरवली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल: राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Increasing Coronavirus Patients in Maharashtra), मृतांचे आकडे चिंता वाढवत असतानाच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा (Remdesivir Injection) पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला अद्याप अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने 8 लाख रेमडेसिवीर औषधासाठी काढलेल्या निविदा (टेंडर) कडे औषध कंपन्यांनी पाठ फिरवली आहे.

ज्या दोन कंपन्यांनी सरकारी निविदा भरली आहे. त्यातील एका कंपनीने रेमडेसिवीर औषध लगेच देऊ शकत नसल्याचे सांगितले असून 30 मे नंतरच आम्ही सुरळीत पुरवठा करू शकतो, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या एका कंपनीने दर दिवशी पाचशे इंजेक्शन पुरवू शकतो, असे सांगितले आहे. म्हणजे 30 मेपर्यंत या कंपनीकडून फक्त 20 हजारच इंजेक्शन मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा असताना कंपन्यांकडून मिळणारं असं उत्तर आणखी चिंता वाढवणारं आहे. विशेष म्हणजे याच कंपन्या पूर्वी सरकारला दर दिवशी 50 हजार औषधांच्या मात्रा पुरवत होत्या. मात्र, ऐन गरजेच्या काळात कंपन्यांनी सरकारला दिलेल्या या अजब उत्तराने प्रशासनासमोरील पेच वाढला आहे.

(हे वाचा-मशिदीत सुरू केलं कोव्हिड सेंटर, रमझानच्या महिन्यात उचललं महत्त्वाचं पाऊल)

राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी खूपच मोठी असून त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजन-रेमडेसिविरची मोठी टंचाई आहे. आज राज्यात दिवसाला 62 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला केवळ 30 ते 35 हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे दिवसाला 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असताना आजही ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. आजही 300 मेट्रिक टनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरुच असून आम्ही शक्य ते प्रयत्न साठा वाढवण्यासाठी करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

(हे वाचा-Explainer : विजेच्या आधारे घरातच ऑक्सिजन निर्मिती कशी करतात?)

दरम्यान, ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे येणारा साठा मिळण्यासाठी आणखी किमान 10 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हा साठा अंदाजे 150 मेट्रिक टनचा असेल. त्यामुळे ऑक्सिजनचा तूटवडा कायम राहणार असून रेमडेसिविरचाही प्रश्न गंभीर होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 20, 2021, 10:54 AM IST

ताज्या बातम्या