मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज ठाकरेंच्या आरोपानंतर माहीममधील 'त्या' अनधिकृत बांधकामावर हातोडा

राज ठाकरेंच्या आरोपानंतर माहीममधील 'त्या' अनधिकृत बांधकामावर हातोडा

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई

माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च : माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. माहीम दर्गा परिसरातील हे अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

काय म्हटलं होतं राज ठाकरे यांनी? 

माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.  हे बांधकाम हटवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरे यांच्या आरोपाची प्रशासनाने दखल घेतली आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.. माहीम दर्गा परिसरातील हे अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

चोख पोलीस बंदोबस्त  

राज ठाकरे यांनी या परिसरात अनिधीकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. अधिकाऱ्यांकडून सुरुवातील या परिसराची पहाणी करण्यात आली आणि त्यानंतर या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray