उल्हासनगर, 16 जून : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar City) दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सहा जणांना उल्हासनगर पोलिसांनी (Ulhasnagar Police) अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेला सुधीर सिंग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) शहर सचिव असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय पदाधिकाऱ्याला दरोड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर 2 च्या हनुमान टेकडी परिसरात सायंकाळच्या सुमारास दुचाकी आणि रिक्षा घेऊन सुधीर सिंग आणि दहा ते बारा जणांचे टोळके पप्या शिंदेवर हल्ला करून त्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी निघाले होते. सुधीर सिंग आणि पप्या यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. यातूनच हा हल्ला केला जाणार होता. दरम्यान या संबंधाचे गुप्त माहिती उल्हासनगर एक नंबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार तात्काळ पोलिसांनी दोन पथकं तयार करून सापळा रचून दुचाकी आणि रिक्षा मधील दोघांना ताब्यात घेतले.
वाचा : सोशल मीडियावर स्वत:ला सुरक्षित कसं ठेवाल? लक्षात ठेवा या 8 गोष्टी
रिक्षाची तपासणी केली असता त्यात तलवारी, कोयते लोखंडी रॉड आणि मिरचीची पूड असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. दरम्यान याप्रकरणी या दोघांना ताब्यात घेऊन आधीच चौकशी केली असता आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करुन ती रवाना देखील गेली आहेत. मात्र या दरोड्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची चर्चा पसरल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत अशी माहिती उल्हासनगर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
टोपीमुळे डोंबिवली पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं
डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरात रेल्वे मैदानात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मृतदेह आढळल्याची माहिती विष्णू नगर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या मृतदेहापासून काही अंतरावर एक टोपी पोलिसांना सापडली आणि या टोपीच्या मदतीनेच हत्येचं गूढ उकललं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, NCP, Police arrest, Robbery, Ulhasnagar