डोंबिवली, 16 जून : डोंबिवली पश्चिम (Dombivli west) येथील बावनचाळ परिसरात रेल्वे मैदानात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मृतदेह आढळल्याची माहिती विष्णू नगर पोलिसांना (Vishnu Nagar Police) मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या मृतदेहापासून काही अंतरावर एक टोपी पोलिसांना सापडली आणि या टोपीच्या मदतीनेच हत्येचं गूढ उकललं आहे. (Dombivli police solved murder case with help of cap) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ परिसरात रेल्वे मैदानात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मृतदेह मैदानात पडलेला होता आणि शेजारी रक्ताचा सडा पडला होता. अंदाजे 45 ते 50 वयोगटातील व्यक्तीच्या डोक्यात काठीने हल्ला करणअयात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी पोाहणी केल्यानंतर मृतदेहापासून काही अंतरावर एक टोपी पोलिसांना आढळून आली. या टोपीच्या मदतीनेच पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं. वाचा : अहमदनगर हायवेवर सापडला मंचक पवारांचा मृतदेह; 1 कोटींच्या जीवन विम्यासाठी पत्नीनेच आखला प्लान या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन टीम्स तयार केल्या. पोलिसांनी घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका सीसीटीव्हीत मृतक व्यक्ती हा पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसत आहे. मृतदेह ज्या व्यक्तीचा आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र, कागद आढळून आले नाहीत आणि त्यामुळे मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाहीये. या मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांना टोपी आढळली. तर सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना टोपी घातलेली एक व्यक्ती दिसली होती. वाचा : तंत्र-मंत्राचा अघोरी खेळ; महिलांना चटके दिल्यानंतर चिमुरड्याला तळपत्या वाळूत पुरलं पोलिसांनी या टोपी घातलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसांनी आपला खाक्य दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीचं नाव अर्जुन मोरे असून त्याला डोंबिवली पश्चिम येथील भागसाळा मैदानातून अटक केली आहे. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारूच्या नशेत होता. त्यादिवशी मृतकासोबत अर्जुन मोरे याचा जेवणावरुन वाद झाला. त्या वादातूनच आरोपीने मृतकाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.