मंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचा आरोप करत, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हायकोर्टानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.
प्राथमिक सुनावणी
उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्ता आरोपाप्रकरणी आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती डि.सी. ठाकूर आणि न्यायमूर्ती व्ही. एस. मेनेझेस यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी पार पडली. या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेली ही याचिका सुनावणीस योग्य आहे की नाही? यावर आता कोर्ट निर्णय देणार आहे. हाय कोर्टाने जर ही याचिका सुनावणीस योग्य आहे असा निर्णय दिल्यास उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात.
हेही वाचा : Sushama Andhare : प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी… ठाकरेंवर, शिंदे गटाकडून प्रहार
गैरी भिडे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमावल्याचा आरोप उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर केला आहे. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी पार पडली. या प्रकरणाचा निकाल हायकोर्टाने राखून ठेवला आहे. ही याचिका सुनावणीस योग्य आहे की नाही याबाबत आता कोर्ट निर्णय देणार आहे. त्यामुळे आता कोर्ट ही याचिका फेटाळून लावणार की सुनावणीसाठी मंजुरी देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Shiv sena, Uddhav Thackeray