कणकवली, 29 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane jan ashirwad yatra) यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा अखेर समारोप झाला. अखेरच्या सभेत सुद्धा नारायण राणे यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला. तसंच, ‘शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे. आमच्या सारख्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज मुख्यमंत्री आहे’ असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलं. मुंबईपासून सुरू झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा अखेर त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या कणकवलीमध्ये संपली आहे. आज समारोपाच्या सभेत नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मला डिवचण्याचा प्रयत्न कोणी आतापर्यंत केला नाही. आमच्या घरावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, माझ्या पाठीशी संपूर्ण दिल्लीतील नेते आहेत, असंही राणे म्हणाले. ‘चुलत बहिणींना चेहरा दाखवू नका, प्रेयसीला पण…’; सुसाइड नोटमध्ये लिहिल्या अटी तसंच, शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे. आमच्या सारख्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री झाले आहे. पण हे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही फक्त पिंजऱ्यात आहेत’ अशी टीकाही राणेंनी केली. ‘सगळे मंत्री होता, मुख्यमंत्री होतात मात्र एक सांगतो कार्येकर्ता असणे यासाठी नशीब लागतं. पंतप्रधानांची विनम्रता एवढी आहे, मी कधी पाहिली नाही. जनआशिर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद यामुळे मला आनंद वाटला. दिल्लीत असताना मला वाटलं नाही एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. मला आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही हे सांगतो. रात्री १ वाजेपर्यत यात्रा सुरू असताना पाहायला मिळत आहेत’ असं राणे म्हणाले. आता बदलणार BIG BOSS चा आवाज? घराघरात घुमणार प्रसिद्ध ‘या’ अभिनेत्रीचा आवाज तर ‘यात्रेमध्ये जनतेचा ठिकठिकणी आशिर्वाद मिळाला आहे. आपल्या यात्रेची उंची वाढवण्याचं काम शिवसेनेनी केली. पहिल्यांदा सुरूवात यात्रेची स्मृतीस्थळापासून करण्यात आली. शिवसेनेला खरा अभिमान वाटायला पाहिजे होता, पहिला अपशकुन विनायक राऊत यांच्याकडून करण्यात आला. त्यांनी सुरूवातीला विरोध केला, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ‘मुख्यमंत्र्यांना जे माहीत नाही ते राणे साहेबांनी सांगितलं यात काहीही चूक नाही. मात्र कोणत्याही प्रकारचं कायदेशीर चुकीचं वक्तव्य नसताना त्यांना चिकित्सक प्रकारे अटक करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यानंतर देखील यात्रेला कोकणात मोठा प्रतिसाद मिळू लागला’ असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.