मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आता बदलणार BIG BOSS चा आवाज? घराघरात घुमणार प्रसिद्ध 'या' अभिनेत्रीचा आवाज

आता बदलणार BIG BOSS चा आवाज? घराघरात घुमणार प्रसिद्ध 'या' अभिनेत्रीचा आवाज

टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ (Big Boss) आता नव्या आवाजासह (New Voice) आणि नव्या आकर्षणांसह (New attraction) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 29 ऑगस्ट : टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ (Big Boss) आता नव्या आवाजासह (New Voice) आणि नव्या आकर्षणांसह (New attraction) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) धुमाकूळ घातल्यानंतर आता बिग बॉस पुन्हा एकदा टीव्हीवरून (TV) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात VOOT या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजलेल्या ओटीटी बिग बॉसमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करन जोहरचा आवाज बिग बॉसच्या रुपात सर्वांना भुरळ घालत होता. मात्र त्यात टीव्हीवर जाताना काही बदल करण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

असा असेल बदल

करन जोहरऐवजी आता पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानचा आवाज हा बिग बॉसचा आवाज असणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान लोकप्रियता मिळाली असली, तरी करन जोहरचा आवाज टीव्ही माध्यमासाठी तितकासा लोकप्रिय ठरणार नाही, असं निर्मात्यांना वाटल्यामुळे असेल कदाचित, पण ओटीटीवरून टीव्हीवर येताना सलमान खानच्या आवाजात हा कार्यक्रम सादर होणार आहे.

आणखी एक आकर्षण

कलर्स वाहिनीनं या कार्यक्रमाची घोषणा करताना सलमान खान एका विश्वसुंदरीसोबत भेटीला येणार असल्याची जाहीरात करण्यात आली आहे. त्यामुळे नेमका कुणाचा आवाज या नव्या कार्यक्रमात ऐकायला मिळणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस हा जगातील अनेक देशांमध्ये गाजलेला कार्यक्रम असून भारतातदेखील गेल्या काही वर्षात ही संकल्पना जोरदार लोकप्रिय होत असल्याचं चित्र आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे वाचा -'दीदी चूक मान्य केलात तर...', VIDEO शेअर करत शर्लिन चोप्राचा शिल्पावर हल्लाबोल

नवे प्रयोग

या कार्यक्रमात दरवेळी काहीतरी नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या क्षेत्रातील बहुचर्चित व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येत असतं. राजकारण, अभिनय, कला, संगीत आणि क्रीडा क्षेत्रातील विविध व्यक्ती या बिग बॉसच्या घरात जाऊन राहत असतात. आता टीव्हीवर येणाऱ्या 15 व्या सीझनमध्ये अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्री रेखाचा आवाज ऐकायला मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे.

First published:

Tags: Big boss, Rekha, Salman khan