News18 Lokmat

#jitendra avahad

VIDEO: ...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी या पोलिसांकडे सोपवले खेकडे

बातम्याJul 5, 2019

VIDEO: ...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी या पोलिसांकडे सोपवले खेकडे

ठाणे, 5 जुलै- ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अनोखं आंदोलन केलं. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चक्क खेकडे आरोपी म्हणून आणले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. असा जावई शोध करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची खोचक टीका आमदार आव्हाड यांनी केली आहे केली आहे. खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले होते. या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमावेत नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे आरोपी म्हणून हजर केले.