सातारा, 17 नोव्हेंबर : साताऱ्यातील (Satara) पेढे व्यावसायिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी काही वर्षांपुर्वी नोटबंदीनंतरच्या एका मुलाखतीमध्ये ‘कोण मोदी? आमच्याकडे साताऱ्याला मोदी पेढे विकतात’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सातारचे पेढेवाले पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. यावेळी मात्र, कारण धक्कादायक आहे. साताऱ्यातील एका पेढे व्यावसायिक गेल्या आठ दिवसापासून इंटरनॅशनल कॉल येत असून अज्ञात व्यक्तीकडून तीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तीस लाख रुपयांची खंडणी (threat call for ransom) न दिल्यास बॉम्बने उडवून देण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस मुख्यालयात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. (Threat call to Satara Pedha dealer) मोदी पेढेवाले (Modi pedewale) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ‘मला पन्नास दिवस द्या, पन्नास दिवसात सर्व काही पूर्वव्रत होईल,’ असं म्हटलं होतं. याचवेळी कराडमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे भोसले यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी मोदींवर टीका केली होती. ‘अरे क्या पचास दिन दो. इथे शेतकऱ्यांना खायला अन्न नाही. शेतकऱ्यांची वाट लागलीय. शेतीमाल सडत पडलाय आणि पंतप्रधान म्हणतात पचास दिन रुको. अरे कोण थांबणार आहे.,’ अशी टीका उदयनराजे यांनी केली होती. पुढे ते म्हणाले, की ‘माझे अनेक मित्र भाजपमध्ये आहेत. भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार सध्या गप्प आहेत? तुम्ही बोलायला घाबरता कशाला असं विचारल्यानंतर ते म्हणतात अरे वो मोदी. अरे मोदी हैं तो क्या? आमच्या इथं साताऱ्याला मोदी पेढेवाले आहेत,’ असा टोला उदयनराजे यांनी लगावला होता. मोदी पेढेवाले पुन्हा चर्चेत खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे चर्चेत आलेले सातारचे पेढेवाले पुन्हा एकदा चर्चेत आलेत. एका पेढे व्यावसायिकाला धमकी देण्यात आली असून त्याचे नाव प्रशांत मोदी (Pedha dealer Prashant Modi) आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांना इंटरनॅशनल नंबरवरून कॉल येत आहेत. 30 लाख रुपये दे अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन अशी धमकी मेसेजद्वारे वारंवार दिली जात आहे. सुरुवातीला पेढा व्यावसायिकाने या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना रात्री-अपरात्री 10 ते 12 वेळा कॉल आणि धमकीचे मेसेजेस करण्यात आल्याने अखेर त्यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ईमेल द्वारे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. Satara: साताऱ्यातील पेढे व्यापाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, “30 लाख दो नहीं तो…” या अर्जात आलेले फोन नंबर आणि मेसेज याचे स्क्रीनशॉट ही जोडण्यात आलेले असून या अज्ञात व्यक्तीकडून आपल्या जीवाला धोका असल्याच या अर्जात करण्यात आलेला आहे. प्रशांत मोदी यांना आठ दिवसांपासून दोन वेगवेगळ्या इंटरनॅशनल नंबर वरून एकाच प्रकारची धमकी देण्यात येत आहे. कंदी पेढेसाठी प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यात एका पेढा व्यावसायिकाला 30 लाखांची खंडणी आणि बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी आल्याने सातारा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता सातारा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून हा कॉल कोणी केला? कुठून आला? आहे याचा सर्वव बाजूंनी सातारा सायबर विभागातील पोलीस शोध घेत आहेत. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली (Chikhali) शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निर्घृण हत्या (shopkeeper murder) केली आहे. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोन दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद करून आतमध्ये थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.