Home /News /maharashtra /

Satara: साताऱ्यातील पेढे व्यापाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, "30 लाख दो नहीं तो..."

Satara: साताऱ्यातील पेढे व्यापाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, "30 लाख दो नहीं तो..."

साताऱ्यातील मोदी पेढे व्यापाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धकमी, "30 लाख दो नहीं तो..."

साताऱ्यातील मोदी पेढे व्यापाऱ्याला बॉम्बने उडवून देण्याची धकमी, "30 लाख दो नहीं तो..."

30 लाख रुपये दे अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन अशी धमकी वारंवार दिली जात आहे.

सातारा, 17 नोव्हेंबर : साताऱ्यातील (Satara) पेढे व्यवसायिकाला गेल्या आठ दिवसापासून इंटरनॅशनल कॉल येत असून अज्ञात व्यक्तीकडून तीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तीस लाख रुपयांची खंडणी (threat call for ransom) न दिल्यास बॉम्बने उडवून देण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस मुख्यालयात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. (Threat call to Satara Pedha dealer) धमकी देण्यात आलेल्या या पेढे व्यवसायकाचे नाव प्रशांत मोदी (Pedha dealer Prashant Modi) असं असून गेल्या आठ दिवसापासून त्यांना इंटरनॅशनल नंबर वरून कॉल येत आहेत. 30 लाख रुपये दे अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन अशी धमकी मेसेजद्वारे वारंवार दिली जात आहे. सुरुवातीला पेढा व्यावसायिकाने या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना रात्री-अपरात्री 10 ते 12 वेळा कॉल आणि धमकीचे मेसेजेस करण्यात आल्याने अखेर त्यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ईमेल द्वारे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जात आलेले फोन नंबर आणि मेसेज याचे स्क्रीनशॉट ही जोडण्यात आलेले असून या अज्ञात व्यक्तीकडून आपल्या जीवाला धोका असल्याच या अर्जात करण्यात आलेला आहे. प्रशांत मोदी यांना आठ दिवसांपासून दोन वेगवेगळ्या इंटरनॅशनल नंबर वरून एकाच प्रकारची धमकी देण्यात येत आहे. वाचा : कॅबचालकाला मारहाण; महिलेनं भररस्त्यात लगावल्या कानशिलात, VIDEO VIRAL कंदी पेढेसाठी प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यात एका पेढा व्यावसायिकाला 30 लाखांची खंडणी आणि बॉम्बने उडवून  देणार असल्याची धमकी आल्याने सातारा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता सातारा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलेला असून हा कॉल कोणी केला? कुठून आला? आहे याचा सर्वव बाजूंनी सातारा सायबर विभागातील पोलीस शोध घेत आहेत. सशस्त्र दरोडेखोरांकडून दुकान मालकाची निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेचा VIDEO बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या चिखली (Chikhali) शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निर्घृण हत्या (shopkeeper murder) केली आहे. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानावर काल रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दोन दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुकान मालक कमलेश पोपट यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिखली शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाचे मुख्य शटर बंद करून आतमध्ये थांबले होते. परंतु, बाजूचे लहान शटर उघडे असतांना एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यातील दोघे जण ग्राहक बनून दुकानात शिरताच त्यांनी कमलेश पोपट यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला.
First published:

Tags: Crime news, Satara

पुढील बातम्या