मुंबई, 13 जून : मुंबईच्या जुहू बीचवर सोमवारी मोठी दुर्घटना घडली. पोहण्यासाठी आलेले 5 जण समुद्रामध्ये बुडाले. यातील एका मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. तर उर्वरीत चार पैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही दोन जण बेपत्ता आहेत. धर्मेश वालजी फौजिया वय वर्ष 16 आणि शुभम योगेश भोगानिया वय वर्ष 16 अशी या दुर्घटनेतील मृत मुलांची नावं आहेत. दोन मुलांचा मृत्यू ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मुलं वाकोला परिसरातून समुद्रात पोहण्यासाठी जुहू बीचवर आले होते. बिपर जॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात उंच लाट उसळत आहेत, मात्र असं असतानाही ही मुलं नजर चुकून समुद्रात उतरली. या घटनेत पाच जण बुडाले, घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील एका मुलाला वाचवण्यात यश आलं. तर उर्वरीत चार पैकी दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. एकाचा मृतदेह रात्री उशिरा सापडला. तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज सकाळी पोलिसांना आढळून आला आहे. तर दोन मुलं अद्यापही बेपत्ता आहेत.
समुद्र खवळलेला असताना तुफानी करायला गेले अन्…जुहू बीचवर मोठी दुर्घटनागुजरातमध्ये हायअलर्ट दरम्यान हवामान खात्याकडून बिपरजॉय चक्रिवादळाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.