Home /News /maharashtra /

हत्तीच्या हत्येमुळे देश हादरला, औरंगाबादमधून आली कुत्र्याची संतापजनक घटना समोर, भयंकर VIDEO

हत्तीच्या हत्येमुळे देश हादरला, औरंगाबादमधून आली कुत्र्याची संतापजनक घटना समोर, भयंकर VIDEO

शहरातील तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे 5 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 07 जून : केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. केंद्र सरकारनेही या घटनेची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. ही घटना ताजी असतानाच राज्यातील औरंगाबाद शहरात संतापजनक घटनासमोर आली आहे. दोन तरुणांनी एका कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शहरातील  तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे 5 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणाची एका सामाजिक संस्थेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पाच जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन आरोपींनी दुचाकीला कुत्रा बांधला. सुरुवातील दुचाकी हळू चालविली परंतु, नंतर जोरात पळविली. त्यामुळे कुत्र्याला पळता आले नाही आणि तो पडला. त्यानंतरही या दुचाकीस्वारांनी दुचाकी थांबवली नाही. गळ्याला फास बसलेल्या कुत्र्याला काही अंतर फरफटत नेले. कुत्रा फरफटत असल्याचे लक्षात आल्यानंतरही दुचाकीस्वारांनी क्रूरपणे त्याला तसंच सोडले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकाने  हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी हा व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा व्हिडिओ पाठवून ट्विट करीत हळहळ व्यक्त करून कारवाईचे आदेश दिले. पालकमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतल्यानंतर सामाजिक संस्था समोर आल्या. त्यांनी तक्रार दिल्यावर क्रांती चौक ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम अकरा व भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. हेही वाचा - पुण्यात मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघांना अटक दुचाकीला कुत्रा बांधून त्याला फरफटत नेणाऱ्या त्या तरुणांविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी क्रांतीचौक पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी केले आहे.  सीसीटीव्हीत दुचाकीचा क्रमांक अर्धवट दिसत असल्याने आरोपीचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aurangabad, Viral video., औरंगाबाद

    पुढील बातम्या