मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाद केला पण वाया गेला! हिंगोलीत अल्पवयीन मुलाकडून बँक फोडण्याचा प्रयत्न; कारण वाचून बसेल धक्का

नाद केला पण वाया गेला! हिंगोलीत अल्पवयीन मुलाकडून बँक फोडण्याचा प्रयत्न; कारण वाचून बसेल धक्का

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Robbery at Bank in Hingoli: हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं बँक फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  News18 Desk

हिंगोली, 25 डिसेंबर: हिंगोली (hingoli) तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं बँक फोडण्याचा प्रयत्न (Minor boy attempts to break bank) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलानं महागडा मोबाइल घेता यावा, यासाठी थेट बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न (Robbery on bank to buy expensive mobile) केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्लॅन फसला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक (Minor accused arrested) केली असून पुढील चौकशी केली जात आहे.

आरोपी अल्पवयीन मुलगा नांदेडमधील एका शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. पण काही दिवसांपूर्वी तो हिंगोली तालुक्यातील टाकळी या आपल्या मूळगावी आला होता. शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने शाळा प्रशासनाने त्याला बँकेत खातं काढायला सांगितलं होती. त्यामुळे आरोपी मुलाची आई त्याला घेऊन हिंगोली शहराजवळील गंगानगर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेली होती. यावेळी आरोपी मुलानं संपूर्ण बँक फिरून व्यवस्थित पाहिली होती.

हेही वाचा-आधी विष प्राशन केलं मग...; सांगलीत प्रेमीयुगुलानं LOVE स्टोरीचा केला भयावह शेवट

दरम्यान, त्याला गाणी ऐकण्यासाठी महागडा मोबाइल फोन हवा होता. पण एवढा महागडा फोन घ्यायचा कसा? त्यासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याला पडला होता. यातूनच त्याने गंगानगर येथील बँक ऑफ इंडियावर डल्ला मारण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार तो शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या पाठीमागे लपला. अंधारात आपल्याला कोणी पाहत नसल्याचं पाहून त्याने भिंतीचा छिद्र पाडायला सुरुवात केली.

हेही वाचा-थंडीने चोरट्यांची केली हवा टाईट; बहाद्दरांनी शेकोटीसाठी पेटवली चक्क दुचाकी

पण काही वेळाने भिंत फोडण्याचा आवाज काही नागरिकांना आला. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, यावेळी अंधारातून कोणीतरी पळून गेल्याचं नागरिकांना दिसलं. या प्रकारानंतर सतर्क झालेल्या नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी मुलगा सावरखेडा गावच्या दिशेनं पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधत रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या मदतीने त्याला पकडलं आहे. गाणी ऐकण्यासाठी महागडा मोबाइल घेण्यासाठी आपण बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपी मुलानं दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Robbery