मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वरात निघण्यापूर्वी काही मिनिटे नवरदेवाने केली आत्महत्या, कारण ऐकून सगळेच झाले अवाक

वरात निघण्यापूर्वी काही मिनिटे नवरदेवाने केली आत्महत्या, कारण ऐकून सगळेच झाले अवाक

लग्नाच्या आदल्या दिवशी त्याच्या मनात नेमकं काय आलं, हे अजूनही कुणाला समजत नाही. मात्र वऱ्हाड निघत असतानाच नवरदेवाने आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी त्याच्या मनात नेमकं काय आलं, हे अजूनही कुणाला समजत नाही. मात्र वऱ्हाड निघत असतानाच नवरदेवाने आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी त्याच्या मनात नेमकं काय आलं, हे अजूनही कुणाला समजत नाही. मात्र वऱ्हाड निघत असतानाच नवरदेवाने आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

जयपूर, 25 डिसेंबर: लग्नासाठी (Marriage) वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं (Few minutes ago) नवरदेवानं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लग्नात (DJ in the marriage) डीजे का आणला नाही, अशी विचारणा करत त्याने गळफास लावून घेतल्याची चर्चा आहे. तरुणाने लग्नापूर्वी काही क्षण आत्महत्या करण्याचा निर्णय़ नेमका का घेतला असावा, याची पोलीस चौकशी करत असून त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लग्नाची सुरू होती तयारी

राजस्थानमधील बांसवाडा परिसरात राहणाऱ्या लाल सिंह उर्फ विनोदच्या लग्नाचं वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होतं. सगळे पाहुणे आणि मित्रमैत्रिणी जमले होते. पुढच्या काही मिनिटांत वऱ्हाड नववधूच्या गावी जाण्यासाठी निघणार होतं. कुटुंबात आनंदाचं वातवरण होतं आणि सर्वजण सेलिब्रेट करत होते. तेवढ्यात विनोद घरातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही.

गळफास घेऊन केली आत्मत्या

विनोदने त्याच्या घराशेजारील झाडावर लटकून स्वतःचा जीव दिला. लग्नाला जाण्यासाठी त्याने डोक्याला एक गमछा बांधला होता. त्याचे दोन तुकडे करून त्यातील एक तुकडा त्याने झाडावर लटकावला होता. थंडीसाठी अंगावर घेतलेल्या शालीचा गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

हे वाचा - मृत्यूनंतर 29 वर्षांनी मायलेकीला मिळाला न्याय; HCने पतीला सुनावली मोठी शिक्षा

अनेक कारणांची चर्चा

विनोदने ही आत्महत्या का केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. लग्नात डीजे आला नसल्यामुळे तो नाराज असल्याची चर्चा वऱ्हाडी मंडळींमध्ये जमली होती. मात्र हे कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

कारणांचा शोध सुरू

विनोद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, तर त्याच्या बहिणीचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. मात्र एकुलत्या एका मुलाचं अवघ्या 21 व्या वर्षी लग्न लागल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Marriage, Suicide