जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही या दोन नेत्यांना करावं लागतंय मंत्रिपदासाठी लॉबिंग

मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतरही या दोन नेत्यांना करावं लागतंय मंत्रिपदासाठी लॉबिंग

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray with Municipal Commissioner Praveen Pardeshi leaves BMC headquarters after their meeting, in Mumbai, Thursday, Dec. 5, 2019. (PTI Photo/Shashank Parade)(PTI12_5_2019_000214B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray with Municipal Commissioner Praveen Pardeshi leaves BMC headquarters after their meeting, in Mumbai, Thursday, Dec. 5, 2019. (PTI Photo/Shashank Parade)(PTI12_5_2019_000214B)

मंत्रिमंडळाचा सर्वोच प्रमुख म्हणून एकदा पद भूषवलं की नंतर पुन्हा दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं राजकीयदृष्ट्या फारसं प्रतिष्ठेच मानलं जातं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई 24 डिसेंबर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लवकर अपेक्षित आहे. राज्याचे दोन मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून इच्छुक आहेत. गेल्या साठ वर्षात यापूर्वी केवळ तीन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतली. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांना लॉबिंग करण्याची वेळ आलीय. मुख्यमंत्रिपद हे राज्याच्या राजकारणात सर्वोच पद आहे. हे पद मिळावं यासाठी दिग्गज आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावतात. हे सर्वोच्च पद मिळाल की राजकीय महत्वकांक्षा पुन्हा तेच पद मिळावं अथवा केंद्रात जावं याकडे बहुतांश नेत्यांचा कल असतो. पण राज्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी मंत्रिपद मिळावं म्हणून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मंत्रिमंडळाचा सर्वोच प्रमुख म्हणून एकदा पद भूषवलं की नंतर पुन्हा दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं राजकीयदृष्ट्या फारसं प्रतिष्ठेच मानलं जातं नाही. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदावरून दूर झाल्यानंतर आपल्याच मंत्रिमंडळाचे मंत्री असलेल्या शरद पवार यांच्या पुलोद मंत्रिमंडळमध्ये काम करण्यास धन्यता मानली. त्यानंतर मराठवाड्यातील शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच आपल्याच मंत्रिमंडळमध्ये मंत्री असलेले शंकरराव चव्हाण यंच्या मंत्रिमंडळात 1986 मध्ये स्वतःची वर्णी लावून घेतली. यानंतर प्रदीर्घ काळानंतर मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचे नेते नारायण राणे यांनी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लावून घेतली. शरद पवार यांची नियोजित प्रकट मुलाखत तात्पुरती रद्द, कारण… नारायण राणे यांच्या नंतर तब्बल 19 वर्षानंतर महाराष्ट्रच्या इतिहासात एकाच वेळी दोन मुख्यमंत्री राहिलेले नेते हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी कंबर कासलीय त्यामुळे हे प्रकरण आता दिल्ली दरबारात असून दोघांचीही नंबर लागतोय की हायकमांड कुणाला पसंती देतात यावर निर्णय अवलंबून आहे. इतिहास पहिला तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, मनोहर जोशी हे नेते मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर दिल्लीत केंद्रीय मंत्री झाले. पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुय्यम भूमिका स्वीकारली नाही. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर राज्यपाल पद नाकारलं होतं. नंतर ते नाखूष होऊन राज्यपाल झाले. पण पुन्हा राज्यात आले ते मुख्यमंत्री म्हणूनच. तीच भूमिका शरद पवार यांची देखील राहिली. सुधाकर नाईक, वसंतराव नाईक, अंतुले, बाबासाहेब भोसले राजकारणातून बाहेर गेले पण दुय्यम भूमिकेत दिसले नाही. भेटीत उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? प्रकाश आंबेडकरांनी केला खुलासा अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात आले तर त्यांना दुय्यम भूमिकेत वावरावे लागेल. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण मंत्री म्हणून समावेश झालेले एकमेव नेते असतील. पण पदाचा मोहच असता असतो की तो भल्या भल्यांना ज नको ते करायला लावतो असं म्हटलं जातं त्याचा अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात