जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भेटीत उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? प्रकाश आंबेडकरांनी केला खुलासा

भेटीत उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? प्रकाश आंबेडकरांनी केला खुलासा

भेटीत उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? प्रकाश आंबेडकरांनी केला खुलासा

‘NRC कायद्यामुळे मुसलमानांसोबतच इथला हिंदूही भरडला जाणार आहे.’

  • -MIN READ
  • Last Updated :

उदय जाधव, मुंबई, 24 डिसेंबर : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘या बैठकीत 26 डिसेंबर रोजी दादर टी टी भागात जे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत, ते आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हावे. CAA आणि NRC संदर्भात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भात चर्चा झाली,’ असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘NRC मुळे हिंदूंमधलाही 40 % समाज भरडला जाणार आहे. भटका विमुक्त समाज हा 12 ते 16% आहे. आदिवासी समाज हा 9 % आहे. आलुतेदार बलुतेदार या सर्वांकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाहीत. त्यामुळे NRC ज्यावेळी लागू होईल त्यावेळी तुमचा जन्म कधी झाला? याचं कागदपत्र मिळणार नाही. म्हणून मुसलमानांसोबतच इथला हिंदूही भरडला जाणार आहे. त्याविरोधा आम्ही 26 डिसेंबरला धरणा आंदोलन करणार आहोत,’ अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा ‘RSS आणि बीजेपी कडून प्रचार सुरू आहे की हा कायदा फक्त मुस्लिमांसाठी आहे. पण ते तसं नसून हिंदूही इफेक्टेड आहे. भटके विमुक्त 110 वर्षे डिटेनशन कँम्प मध्ये राहिले. आदिवासींच्या सेक्टर मध्ये ब्रिटीश जाऊ शकले नाहीत. या विविध हिंदू समाजाच्या समस्यांबद्दल चर्चा झाल’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? स्पर्धेत 3 नेते आघाडीवर दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर आज दुपारी 1 वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत भीमा कोरेगावमधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एल्गार परिषदेबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय. भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला 1 जानेवारी 2018 रोजी 200 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी कोरेगाव भीमा याठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर सरकारकडून एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या लेखक आणि साहित्यिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात