सुट्टीची मज्जा जीवावर बेतली! जोगेश्‍वरीतील दोघांना विरारच्या तलावात जलसमाधी

सुट्टीची मज्जा जीवावर बेतली! जोगेश्‍वरीतील दोघांना विरारच्या तलावात जलसमाधी

पर्यटनबंदी असतानाही 10 जणांचा ग्रुप दोन बाइक आणि एका कारने विरार पूर्वेतील भाटपाडा येथील तलावावर पर्यटनासाठी आला होता....

  • Share this:

वसई, 13 सप्टेंबर: मुंबई-जोगेश्‍वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोघा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवान व विरार पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा...अखेर कोविडनं गाठलंच.. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई-जोगेश्‍वरी हिंद नगर कॉलनी येथील 10 जणांचा ग्रुप दोन बाइक आणि एका कारने विरार पूर्वेतील भाटपाडा येथील तलावावर आला होता. या ग्रुपमधील मंगेश राणे ( 25) आणि सूर्यकांत सुवर्णा (34) हे दोघे तलावाच्या काठावर फोटो काढत असताना पाय घसरून पाण्यात पडले. दोघेही बुडू लागल्याने इतर तरुणांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. मंगेश राणे हा महिंद्रा अँड महिंद्र; तर सूर्यकांत सुवर्णा हा एजीसएस या खासगी कंपनीचा कर्मचारी आहे.

दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे वसई-विरारमधील पर्यटनबंदी पालघर जिल्हा प्रशासनाकडून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतरही मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वसई-विरारमध्ये पर्यटनासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पर्यटनबंदी असतानाही अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यंदाच्या कोरोना आपत्तीतही घडल्या आहेत. पोलीस व महापालिका प्रशासनाची नजर चुकवून वसईतील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा सुट्टीच्या दिवशी राजरोस वावर दिसून येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग प्रतिबंध अधिनियम कायदा धाब्यावर बसवला गेला आहे.

हेही वाचा...प्रेमीयुगुलांचा भयानक अंत! जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात अशीच घटना घडली आहे. वर्षा सहलीसाठी आलेल्या 5 जिवलग मित्रांपैकी 2 मित्रांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. शुभम नारायण गुजर (वय 18) आणि ऋषिकेश शशिकांत तोटे (वय 18, रा. वडाळीभोई, चांदवड) अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2020, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading